MB NEWS-पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस टोकवाडी येथे समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

 पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस टोकवाडी येथे समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा



 परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 

 भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस टोकवाडी येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. टोकवाडी भाजपाच्या वतिने वाढदिवस नेतृत्वाचा,सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम राबविण्यात आला. 



       लोकनेत्या, राष्ट्रीय सचिव भाजपा, माजी ग्रामविकास मंत्री, रणरागिणी पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.26 जुलै रोजी  टोकवाडी येथे भाजपच्या वतीने प्रभु रत्नेश्वरास रुद्र अभिषेक, रत्नेश्वर पर्वता लगत वृक्षारोपण,पेढे व फळ वाटप कारण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेते मारोती मुंडे गुरुजी  यांनी पंकजाताई मुंडेच्या वाढदिवसा निमिताने रत्नेश्वर पालखी विसावा स्थळ निर्मिती  बैठक व्यवस्था व वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे व भाजपाचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. लोकनेत्या पंकजाताई या निस्वार्थ सेवा करुन समाजाचा सर्वांगीण विकास साधणारे नेतृत्व आहे.पवित्र कुळात जन्मलेल्या व वाढलेल्या पंकजाताई यांचे भविष्य उज्वल असल्याचे ज्येष्ठ नेते मारोती मुंडे यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.  यावेळी टोकवाडी व परिसरातील भाजपा कार्यकर्त्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन व आभार भाजपाचे संजय मुंडे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार