इमेज
प्रशासकीय गतिमानता, सुसूत्रतेसाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना उपविभागांचे स्वतंत्र विभाग; विभागांची संख्या ४५ होणार सामान्य प्रशासन विभाग प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज आँफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल, योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणे शक्य होणार आहे. सध्या मंत्रालयात ३३ प्रशासकीय विभाग होते. यामध्ये एकाच विभागात दोन अथवा तीन उपविभाग होते. उपविभाग दोन किंवा तीन असले तरी विभागाची आस्थापना एकाच विभागप्रमुखांकडे असते. यामुळे मनुष्यबळाच्या वितरणात अडचणी निर्माण होत असत. त्याचबरोबर उपविभागाचे कामकाजाचे स्वरूप भिन्...

MB NEWS-*ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन* *आरोग्य सेवा सप्ताहाचा होणार समारोप*


*ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन*



*आरोग्य सेवा सप्ताहाचा होणार समारोप*


परळी (दि. 21) ---- : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी येथे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रम व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


परळीतील मोंढा मैदान येथे सायंकाळी 6.00 वा. हा कार्यक्रम संपन्न होणार असून, या कार्यक्रमात 10000 गरजू महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतील नगर पालिकेंतर्गत मंजुरी मिळालेल्या 121 घरकुलांच्या पहिल्या हफत्याचे त्याचबरोबर नगर परिषदेच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या 100 घरकुलांच्या चेकचेही वाटप करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमात पंचायत समिती अंतर्गत 850 विहिरींच्या मंजुरीचे पत्र, रमाई घरकुल योजनेंतर्गत मंजूर घरकुलांचे 350 चेकचे वाटप तसेच पशुधन कर्जाच्या चेकचेही वाटप करण्यात येणार आहे. 


या कार्यक्रमांनंतर ना. अजितदादा पवार यांच्या अभिष्टचिंतानाचा कार्यक्रम संपन्न होणार असून, यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्या सह आ. संजय भाऊ दौंड, जि. प. अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


*आरोग्य सेवा सप्ताहाचा समारोप*


ना. धनंजय मुंडे यांच्या 15 जुलै या जन्मदिनापासून ते ना. अजितदादा पवार यांच्या जन्मदिनापर्यंत (22 जुलै) या सात दिवसात परळीत राबविण्यात आलेल्या आरोग्य सेवा सप्ताह या उपक्रमाचा समारोप देखील या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. 


या उपक्रमात मागील 5 दिवस महारक्तदान शिबीर, नेत्र तपासणी, सर्व रोग निदान शिबीर, भव्य लसीकरण मोहीम यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.


करोना विषयक नियमांचे पालन करून या कार्यक्रमाना उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परळी वैजनाथ नगर परिषद,  पंचायत समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या