MB NEWS-भाजयुमोच्या वतीने पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त उड्डाणपुलावरील खड्डे बुजवून सेवाकार्य 🕳️ इथले सत्ताधारी डोळे बंद करून बसलेले आणि झोपी गेलेले आहेत-निळकंठ चाटे

 भाजयुमोच्या वतीने पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त उड्डाणपुला वरील खड्डे बुजवून सेवाकार्य 


🕳️ इथले सत्ताधारी डोळे बंद करून बसलेले आणि झोपी गेलेले आहेत-निळकंठ चाटे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या  वाढदिवसानिमित्त सत्ताधारी आघाडी सरकारला व स्थानिक प्रशासनाला लक्षात आणून देण्यासाठी लक्षवेधी उपक्रम राबविण्यात आला. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या नेतृत्वाखाली उड्डाणपूलावरील खड्डे बुजवून या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले. इथले सत्ताधारी डोळे बंद करून बसलेले आणि झोपी गेलेले आहेत.या निगरगट्ट सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी भाजयुमोच्या वतीने यापुढे रस्त्यावर उतरणार असल्याचे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी सांगितले.

            शहराचा मध्यवर्ती वाहतुकीचा दुवा असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर ठिक ठिकाणी मोठ मोठे खड्डे झाले आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे वारंवार वाहतूक खोळंबलेली असते नागरिकांना याचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. याकडे कोणाचे लक्ष नाही सत्ताधारी विकासाच्या फक्त गप्पा मारतात प्रत्यक्षात मात्र याकडे दुर्लक्ष करतात. शहरातील नागरी समस्या वर लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून व सेवाकार्य करुन वाढदिवस करा हा पंकजा मुंडे यांचा संदेश लक्षात घेऊन दि.25 जुलै रोजी  शहरातील उड्डाणपुलावरील खड्डे बुजवुन भाजयुमो ने  अनोख्या पद्धतीने उपक्रम राबविला. या उपक्रमात मोठ्या संख्येने भाजयुमो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.



            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार