सदगुरु सेवा समितीच्या-वतीने महाप्रसादाचे आयोजन

इमेज
श्री क्षेत्र येवती( लघु आळंदी) येथील मठाधिपती श्री सद्‌गुरू नराशाम महाराज येवतीकर यांचा ४७ वा वाढदिवस :अभिष्टचिंतनाचा उत्साह विशेष वृत्त /अमोल जोशी पाटोदा      नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती (लघु आळंदी) येथील जागृत देवस्थान सद्‌गुरू नराशाम महाराज मठ संस्थांनचे मठाधिपती श्री सद्‌गुरू नराशाम महाराज यांचा ४७वा वाढदिवस मोठ्या उत्साहात भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला आहे. श्री सद्गुरू नराशाम महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी व सद्गुरु चा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविकांनी एकच गर्दी केली आहे. मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती येथे श्री सद्‌गुरू नराशाम महाराज जागृत मठ संस्थान आहे. या संस्थांनचे  मठाधिपती सद्‌गुरू नराशाम महाराज यांचा ४७वा वाढदिवस सद्‌गुरू सेवा समितीतर्फे नुकताच मठ संस्थान येवती (लघु आळंदी ) येथे उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी श्री सद्‌गुरू नराशाम महाराज यांची औक्षवंत, पाद्यपूजा, ग्रंथतुला करण्यात आली आहे. यावेळी ३१ सुहासिनी यांनी श्री सद्‌गुरू नराशाम महाराज यांना औक्षवंत करून शुभेच्छा दिल्या आहेत. सदगुरु सेवा समितीच्या-वतीन...

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांचे औरंगाबाद विमानतळावर जंगी स्वागत* *ताईसाहेब, आगे बढो..च्या घोषणांनी परिसर दणाणला*

 *पंकजाताई मुंडे यांचे औरंगाबाद विमानतळावर जंगी स्वागत*



*ताईसाहेब, आगे बढो..च्या घोषणांनी परिसर दणाणला*


औरंगाबाद ।दिनांक २८।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचे आज सायंकाळी विमानतळावर भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. "ताईसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है" च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.


पंकजाताई मुंडे आजपासून परळी, बीडच्या दौर्‍यावर जाणार आहेत. सायंकाळी 5 वा. मुंबईहून विमानतळावर आगमन झाले. नुकताच त्यांचा वाढदिवस होता, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. पंकजाताई मुंडे यांचे  आगमन झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत करत शुभेच्छा दिल्या."ताईसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है" च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या