युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-उद्या परळीत भाजपचेही आंदोलन

 उद्या परळीत भाजपचेही आंदोलन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      महाराष्ट्र प्रदेश भाजप च्या वतीने बारा आमदारांच्या निलंबन प्रकरणी राज्य सरकारचा निषेध करण्यात येत आहे.त्याअनुषंगाने परळीतही भाजपच्या वतीने उद्या मंगळवारी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

         महाराष्ट्र विधानमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकशाहीला टाळे ठोकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या निर्दोष बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या सूचनेनुसार दिनांक 6 जुलै मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता   तहसील कार्यालय येथे आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलनकरण्यात येणार आहे.

       तरी  परळी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे ज्येष्ठ नेते ,भाजपा युवा मोर्चा महिला आघाडी, अल्पसंख्यक मोर्चा, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, प्रभाग प्रभारी शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख, सर्व संस्थांचे संचालक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनभाजपा तालुकाअध्यक्ष सतिष मुंडे,शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया व पदाधिकारी यांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या