प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS- *महिला महाविद्यालयात कार्यालयीन अधिक्षक प्रमोद पत्की यांचा सेवानिवृत्ती निमित्त सेवागौरव संपन्न*

 *महिला महाविद्यालयात कार्यालयीन अधिक्षक प्रमोद पत्की यांचा सेवानिवृत्ती निमित्त सेवागौरव संपन्न*



परळी वैजनाथ दि.०२ (प्रतिनिधी)

        येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचे कार्यालय अधिक्षक प्रमोद पत्की यांच्या सेवानिवृत्त निमित्त सेवागौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमोद पत्की यांचा सपत्नीक मान्यवरांच्या उपस्थितीत सेवागौरव करण्यात आला.

             शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्थापनेपासूनचे कार्यालयीन अधिक्षक म्हणून महाविद्यालयात सेवा केली. बुधवारी (ता.३०) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाली. यानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी (ता.०२) सेवागौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष शामराव देशमुख यांच्या प्रतिमेचे व सरस्वती पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कार्यालयीन अधिक्षक प्रमोद पत्की यांचा सपत्नीक सेवागौरव व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी श्री.पत्की यांच्या बदल मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख प्राचार्य लक्ष्मण मुंडे यांनी  श्री.पत्की यांच्या कार्याचा गौरव केला. सुत्रसंचालन प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी आभार प्रा डॉ राजकुमार यल्लावाड यांनी मानले. कार्यक्रमास संस्थेचे मार्गदर्शक अनिलराव देशमुख, अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, संचालक मनोहरराव कांबळे, प्रा.डॉ विद्या देशपांडे, छाया देशमुख, मंगेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या