इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-पंकजाताई मुंडेंच्या सहभागाने परळीत पूरग्रस्तांसाठी जमा झाली मोलाची मदत* *मदतफेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; अनेक दानशूर सरसावले*

 *पंकजाताई मुंडेंच्या  सहभागाने परळीत पूरग्रस्तांसाठी जमा झाली मोलाची मदत*



*मदतफेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; अनेक दानशूर सरसावले* 


परळी ।दिनांक २९।

राज्यातील अतिवृष्टीबाधित  व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज शहरातून निघालेल्या भाजपच्या मदतफेरीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक दानशूर नागरिक वस्तू आणि निधीच्या स्वरूपात मदत करण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले.



शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मदतफेरीला सुरवात झाली. बस स्थानक रोड, एकमिनार चौक, स्टेशन रोड, टाॅवर, गणेशपार आदी प्रमुख मार्गावरून ही मदतफेरी काढण्यात आली. २६ जुलै रोजी पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस होता. राज्यातील विविध भागात पुरामुळे झालेले नागरिकांचे प्रचंड नुकसान लक्षात घेता पंकजाताईंनी केलेल्या आवाहनानुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच अनुषंगाने शहरातून आज मदतफेरी काढण्यात आली.


*पंकजाताई स्वतः सहभागी*

-----------------------------

पंकजाताई मुंडे या मदतफेरीत स्वतः सहभागी झाल्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच वैद्यनाथ काॅलेजचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते.  फेरी निघाल्यानंतर काही वेळातच मोठी रक्कम जमा झाली तसेच व्यापाऱ्यांनी किराणा साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांना दिल्या. ही सर्व मदत एकत्रित ट्रकद्वारे पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या