MB NEWS-परळीत बारा आमदारांच्या निलंबन प्रकरणी भाजपने आंदोलन करुन नोंदवला राज्य सरकारचा निषेध

 परळीत बारा आमदारांच्या निलंबन प्रकरणी भाजपने आंदोलन करुन नोंदवला राज्य सरकारचा निषेध



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      महाराष्ट्र प्रदेश भाजप च्या वतीने बारा आमदारांच्या निलंबन प्रकरणी राज्य सरकारचा निषेध करण्यात येत आहे.त्याअनुषंगाने परळीतही भाजपच्या वतीने आज (दि.६) आंदोलन करुन राज्य सरकारचा निषेध नोंदविला. हे राज्य सरकार लोकशाहीचा गळा घोटणारे सरकार असुन सत्तेचा गैरवापर करून लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

         महाराष्ट्र विधानमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकशाहीला टाळे ठोकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या निर्दोष बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी येथे भाजपाने आज दिनांक 6 जुलै मंगळवार रोजी  तहसील कार्यालय येथे आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केले.तहसीलदारांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. या वेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा ईटके गुरुजी, जीवराज ढाकणे ,भीमराव मुंडे, भाजपा महिला आघाडीच्या डॉ.शालिनीताई कराड, श्रीराम मुंडे, राजेश गित्ते, नगरसेवक पवन मुंडे ,उमेश खाडे ,राजेंद्र ओझा, महादेव ईटके, राष्ट्रीय नेते अब्दुल करीम ,रमेश गायकवाड, वैजनाथ जगतकर ,राजेभाऊ दहिवाळ, ऍड अरुण पाठक, अश्विन मोगरकर ,नितीन समशेट्टी ,सचिन गित्ते, मोहन जोशी, संजय मुंडे, योगेश पांडकर, सुशील हरंगुळे, प्रल्हाद सुरवसे, विनायक गडदे, जितेंद्र मस्के ,पप्पू चव्हाण, नरेश पिंपळे, गोविंद चौरे, पवन तोडकरी, गणेश होळंबे, विजयकुमार ठोसे, गोपीनाथ गित्ते, नितीन मुंडे, चैतन्य मुंडे, गोविंद मोहेकर, श्रीपाद शिंदे, ओंकार गित्ते आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार