MB NEWS-लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दादाहारी वडगांव जिल्हा परिषद गटात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन;मोठ्या संख्येने उपस्थित रहा-राजेश गिते.

 लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दादाहारी वडगांव जिल्हा परिषद गटात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन;मोठ्या संख्येने उपस्थित रहा-राजेश गिते  


परळी (प्रतिनिधी) भाजपा राष्ट्रीय सचिव तथा मा ग्राम विकास मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दादाहारी वडगांव जिल्हा परिषद गटात विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमास जिल्हा परिषद गटातील सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती सदस्य राजेश गिते यांनी केले आहे.                                  

     पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत ज्या मध्ये.  निराधार वृध्दांना ब्लॅंकेट वाटप,कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना साडी चोळी भेट, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,कोरोना योध्दांचा सन्मान, आणि वृक्षारोपण असे कार्यक्रम दादाहारी वडगांव या ठिकाणी  २६/१२/२०२१रोजी सकाळी १०वाजता आयोजित करण्यात आला आहे,.      तरी गटातील सर्व गावां मधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, सरपंच, चेअरमन,शक्ति केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दादाहारी वडगांव जिल्हा परिषद गट प्रमुख राजेश गिते यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !