MB NEWS-नीट परीक्षेत 720 पैकी 650 गुण घेवुन उत्तीर्ण झाल्याबद्दल* *पवनराजे अर्बन निधी बँकेच्या वतीने चि.यश श्रीकांत ढेेले याचा सत्कार*

 नीट परीक्षेत 720 पैकी 650 गुण घेवुन उत्तीर्ण झाल्या बद्दल पवनराजे अर्बन निधी बँकेच्या वतीने  चि.यश श्रीकांत ढेेले याचा सत्कार

*परळी वैजनाथ / प्रतिनिधी*

माहे सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या नीट परिक्षेत परळी येथील चि.यश श्रीकांत ढेले याने 720 पैकी 650 गुण घेत ओबीसी प्रवर्गातून देशात 1300 रँक घेवुन उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादित केले असून त्याच्या या यशाबद्दल आज सोमवार दि 22 नोव्हेंबर रोजी पवनराजे अर्बन निधी बँकेत मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.

    आज सोमवार दि 22 नोव्हेंबर रोजी पवनराजे अर्बन निधी मल्टीपर्पज बँकेच्या वतीने परळीचे पहिले तहसीलदार स्व.मन्मथआप्पा ढेले व  माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे व नगराध्यक्षा सौ.सरोजीताई हालगे यांचा नातू चि.यश श्रीकांत ढेले याने माहे सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या नीट परिक्षेत परळी येथील चि.यश श्रीकांत ढेले याने 720 पैकी 650 गुण घेत ओबीसी प्रवर्गातून देशात 1310  तर ओपनमधून 4010 वा रँक घेवुन उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादित केले आहे. यश श्रीकांत ढेले याचा आज सोमवारी पवन राजे अर्बन निधी मल्टीपर्पज बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नारायणराव सातपुते, पवनराजे बँकेचे संचालक प्रल्हादराव काळे, शेखर स्वामी, ज्येष्ठ पत्रकार अनंत भातांगळे गुरुजी, संजय जाधव रावसाहेब जाधव,  उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे पाटील, सचिव गोविंदराव भरबडे,  संचालक बालासाहेब पोरे, गोविंदराव मुंडे,म आरफोदीन तांबोळी,मयुर जिरगे, रामेश्वर भोसले, ज्ञानेश्वर सातपुते, सचिन भरबडे, सोनाली वैराळे, वैजयंतीमाला घवले, विनायक राठोड,अजय जोशी, कार्यालयीन कर्मचारी सोमनाथ चाटे, सत्यप्रकाश कराड, निलेश पुजारी,मयुरी शिंदे, यांच्या सह सर्व संचालक मंडळ कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंत भातांगळे व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष गोविंद भरभडे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार