परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-*आजचे राशिभविष्य* ⬛ ््् *दि.२१ नोव्हेंबर २०२१*

  *आजचे राशिभविष्य* ⬛

     ््््*दि.२१ नोव्हेंबर २०२१*



मेष ः चंगळवादावर नियंत्रण आवश्यक आहे. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. आपले काम चोख करा. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस. आत्मविश्‍वास कमी होईल.


वृषभ ः आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. स्वभावामुळे लोक आपलेसे होतील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. मनोरंजनामध्ये दिवस जाईल.


मिथुन ः अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. कर्ज प्रकरणांमध्ये अडचणी येतील. संयम ठेवणे गरजेचे आहे. आळस व परावलंबित्व सोडावे लागेल.


कर्क ः जवळच्या लोकांचे सहकार्य लाभेल. प्रगतीचा मार्ग मिळेल. नियोजनबद्धतेमुळे यशाकडे वाटचाल कराल. जीवलगांचा सहवास लाभेल


सिंह ः वरिष्ठांची मर्जी राखाल. विश्‍वास संपादन कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. कार्याचे कौतुक होईल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल.


कन्या ः ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस. आत्मविश्‍वास द‍ृढ ठेवणे आवश्यक आहे. सरकारी कामांमध्ये अडचणी येतील. नियमांचे पालन करा.


तुळ ः उष्णतेचे विकार उद्भवतील. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहा. उष्णतेचे विकार होण्याची संभावना. संतुलित आहार महत्त्वाचा आहे.


वृश्‍चिक ः अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामांना गती मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल.


धनु ः लोकप्रियता मिळेल. चांगल्या कामामुळे पदोन्‍नती होण्याची शक्यता आहे. आर्थिक विकास होईल.


मकर ः परावलंबी स्वभावामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. कामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे.


कुंभ ः कौटुंबिक जबाबदारी वाढेल. अस्वस्थता निर्माण होईल. व्यावहारिक सावधानता बाळगा.


मीन ः संवादाने प्रश्‍न सुटतील. वादविवादात यश मिळेल. आप्तस्वकीयांचे सहकार्य लाभेल. कलावंत, लेखकांना प्रोत्साहन मिळेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!