MB NEWS-ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांना पिरंगुट ,पुणे यांचे तर्फे संत जगमित्रनागा पुरस्कार जाहिर

 ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांना पिरंगुट ,पुणे यांचे तर्फे संत जगमित्रनागा पुरस्कार जाहिर

पुणे  (प्रतिनिधी)

संतवाड्;मयाचे संशोधन कार्याबद्यल तसेच संतजगमित्र नागा चरित्र लिखाण केले म्हणून ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांना पिरंगुट ,पुणे यांचे तर्फे संतजगमित्रनागा पुरस्कार जाहिर झाला असून याचे वितरण दिनांक२८नोव्हेंबर रोजी मान्यवरांचे हस्ते पुणे जिल्ह्यातील पिरंगुट येथे होणार आहे.


 ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराजआंधळे यांनी संत जगमित्रनागा चरित्र संशोधन करून लिहले आहे.पुणे विद्यापीठात सदरचे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासासाठी ठेवण्यात आले आहे.संत जगमित्रनागा यांचे १८-२०अभंग शोध करुन ते चरित्र लिखाणातून उपलब्ध करुन दिले.विठोबाची टोंगी नंदागौळ येथे या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सुंदर मंदिर झाले.पावदुका विसावा मंदिर मूर्ति स्थापना तर लेखकाचे हस्तेच झाली.याशिवाय या संशोधन व लिखाणामुळे पिरंगुट येथे संतजगमित्र नागा नावाचे ग्रथांलय तसेच स्मृती स्तंभ उभारला जाऊन संतजगमित्र नागा व वाघ धरून आणलेली मूर्ति कोरली गेली. 

यापूर्वी आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्काराने श्री आंधळे यांना गौरविण्यात आलेले आहे.हा पुरस्कार वितरणसोहळा दि२८नोव्हेंबर दुपारी१२वाजता श्रीभैरवनाथ मंदिर ,पवळेआळी,पिरंगुट जिल्हा पुणे येथे मान्यवरांचे उपस्थितीत होणार आहे,असे सरपंच श्री चांगदेव पवळे,पोलिसपाटिल श्री प्रकाश पवळे,उपसरपंच श्रीराहुल पवळे, राजाभाऊ वाघ,श्री ज्ञानेश्वर पवळे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार