इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *मांडवा येथील श्री. काळभैरव मंदिर यात्रोत्सव व कलशारोहण सोहळ्यात पंकजा मुंडे यांनी लावली उपस्थिती* • 🕳️ *काळभैरवाचे मनोभावे दर्शन व ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांच्या किर्तनाचे श्रवण*

 *मांडवा येथील श्री. काळभैरव मंदिर यात्रोत्सव व कलशारोहण सोहळ्यात पंकजा मुंडे यांनी लावली उपस्थिती*

• 🕳️  *काळभैरवाचे मनोभावे दर्शन व ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांच्या किर्तनाचे श्रवण* 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     तालुक्यातील मांडवा येथील श्री. काळभैरव मंदिर यात्रोत्सव व कलशारोहण सोहळ्यात भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी  उपस्थिती लावली.यावेळी त्यांनी काळभैरवाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच रामायणाचार्य ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांच्या किर्तनाचे श्रवण केले.

     मांडवा ता.परळी येथील ग्रामदैवत श्री काळभैरव देवस्थान समितीच्या वतीने आयोजित श्री रामकथा व ज्ञानयज्ञ सोहळा सप्ताहाचा समारोप आज हजारो भाविक भक्तांच्या साक्षीने मोठया थाटात आणि उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी भाजप राष्ट्रीय सचिव श्री. काळभैरवाचे मनोभावे दर्शन घेऊन ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांच्या सुश्राव्य किर्तनाचा लाभ घेतला. पंकजा मुंडे यांचे मांडवा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या