इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *परळीतील खळबळजनक घटना; उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या*

*परळीतील खळबळजनक घटना; उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

परळी येथे सकाळी सकाळी खळबळजनक घटना समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या क्ष-किरण तंत्रज्ञाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळलेले नाही.

      मयत सिध्दार्थ पंडितराव जाधव हे परळी उपजिल्हा रुग्णालय येथे क्ष-किरण तंत्रज्ञ म्हणुन सुमारे दोन महिण्यापुर्वी रुजु झाले होते. मंगळवारी सकाळी जेव्हा सिध्दार्थ जाधव नौकरीवर आले नाहीत म्हणुन मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईल उचलत नसल्यामुळे राहत असलेल्या शासकीय निवासस्थानाकडे विचरणा केली असता दरवाजा आतुन बंद असल्यामुळे दवाखाना प्रशासनाने पोलिसांकड संपर्क करुन पोलिसांना बोलावून घेतले. घर उघडून पाहिले असता जाधव हे लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. सिध्दार्थ जाधव यांनी का आत्महत्या केली हे कळु शकले नाही. पोलिस तपासात हे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या