मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS-चिंताजनक:परळीच्या ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले ! मलकापुर शिवारातून कडबाकुटी यंत्र,तुरीचे पोते तर सेलु शिवारात धुर्यावर लावलेल्या मोटारसायकलची चोरी

 चिंताजनक:परळीच्या ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले !

मलकापुर शिवारातून कडबाकुटी यंत्र,तुरीचे पोते तर सेलु शिवारात धुर्यावर लावलेल्या मोटारसायकलची चोरी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     परळी व परिसरात दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे. परळी तालुक्यातील मलकापुर शिवारातून कडबाकुटी यंत्र,तुरीचे पोते व अन्य ऐवज तर सेलु शिवारात धुर्यावर लावलेल्या मोटारसायकलची चोरीची घटना घडली आहे.या घटनेने शेतकरी, नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.या  घटनांची ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.५ रोजी नोंद झाली आहे. परळीच्या ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असुन नागरीकांची चिंता वाढली आहे.

           परळी जवळील मलकापुर शिवारातून फिर्यादी  निवृत्ती लिंबाजीराव देशमुख (वय ४४) रा.देशमुख गल्ली परळी वैजनाथ यांच्या शेतातील शेडमधुन कडबाकुटी यंत्र, त्यावरील इलेक्ट्रीकल मोटार, ४२ तुरीच्या पोत्यांपैकी ५ पोते असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळविला.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोह टोले हे अधिक तपास करीत आहेत.तर दुसऱ्या घटनेत सेलु शिवारात धुर्यावर लावलेल्या मोटारसायकलची चोरीची घटना घडली आहे.फिर्यादी  बालासाहेब रामभाऊ सातपुते या.सेलु यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (किंमत ५०हजार ) अज्ञात चोरांनी चोरुन नेली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सफौ गित्ते हे करीत आहेत. सध्याच्या काळात सर्वत्र चोरीच्या घटननांची साखळी खंडीत होत नसल्याने लोकांमध्ये एकप्रकारे मोठा धसका बसलेला आहे.अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता चोरीच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाचे प्राधान्य आहे.अशाही परिस्थितीत चोरट्यांची मनस्थिती मात्र बदललेली दिसत नाही.सर्वत्र चोरटे धुमाकूळ घालत आहेत. दररोज चोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होत आहे.ही चिंतेत भर टाकणारी बाब ठरत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....