इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-दर्पणदिन:पत्रकार संभाजी मुंडे यांचा रिपोर्टर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मान

 पत्रकार संभाजी मुंडे यांचा रिपोर्टर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मान 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

टीव्ही 9 मराठीचे बातमीदार संभाजी मुंडे यांचा आज दर्पण दिनाच्या औचित्यावर "रिपोर्टर ऑफ द इअर" पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या एका वार्ताहरास कराड हॉस्पिटलच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. आज एका विशेष कार्यक्रमात संभाजी मुंडे यांना हा सन्मान देण्यात आला.

जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे यांच्या अध्यक्षतेखाली आज कराड हॉस्पिटल येथे दर्पण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.शालिनीताई कराड व डॉ. बालासाहेब कराड यांच्या वतीने संभाजी मुंडे यांचा सन्मान करण्यात आले. कोरोनाच्या मागील दोन वर्षांच्या कालावधीत पत्रकार संभाजी मुंडे यांनी बातमीदारी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती. नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर लक्षवेधी करून प्रश्न मार्गी लावण्यास भाग पाडणारे वार्तांकन केले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक आशा विविध क्षेत्रातील उपेक्षितांना त्यांच्या माध्यमातून वाचा फुटली आहे असे प्रतिपादन डॉ.शालिनीताई कराड यांनी व्यक्त केले. या पुरस्कार सोहळ्यास अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, पत्रकार मोहन व्हावळे, धनंजय आढाव, महादेव शिंदे, प्रवीण फुटके, कैलास डुमणे, महादेव गित्ते, विकास वाघमारे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या