MB NEWS- *सौंदणा येथे लाखो रुपये किंमतीचा गुटखा जप्त; परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*

style="font-size: x-large;"> *सौंदणा येथे लाखो रुपये किंमतीचा गुटखा जप्त; परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*

परळी (प्रतिनिधी)

      सर्वत्र गुटखा विक्री राजरोसपणे सुरु असुन जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीसांचे धाडसत्र सुरू आहे. या अनुषंगाने सौंदणा ता.अंबाजोगाई येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये साठा करून ठेवलेला लाखो रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपींविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात नेमणूकी वरील पोलिस हवालदार बालाजी शेषराव दराडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार आरोपी गोविंद संदिपान उद्रे (वय २३) रा.सौंदणा याच्या राहत्या घराच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये विविध प्रकारचा गुटखा साठा करून ठेवलेला आढळून आला.राज्यात गुटखा बंदी असतानाही बेकायदेशीररित्या साठा जवळ बाळगुन चोरटी विक्री करण्यासाठी ३ लाख २९ हजार ६२० किंमतीचा गुटखा माल आढळून आला. अधिक चौकशी केली असता हा माल बसवकल्याण (कर्नाटक) येथुन आणल्याची माहिती आरोपीकडून मिळाली.या प्रकरणी आरोपी गोविंद संदिपान उद्रे (वय २३) रा.सौंदणा व बसवकल्याण (कर्नाटक) दुकान नंबर ५ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि मुंडे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !