दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS- *बीड जिल्ह्याला मिळाले 13 पशुधन विकास अधिकारी*

 *बीड जिल्ह्याला मिळाले 13 पशुधन विकास अधिकारी*



*पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा रिक्त पदे भरण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा*


बीड (दि. 10) - : राज्य शासनाच्या पशु संवर्धन विभागाने महाराष्ट्र पशु संवर्धन सेवा गट - अ अंतर्गत सरळ सेवेने नियुक्त केलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती यादी निर्गमित केली असून, यांतर्गत बीड जिल्ह्यातील 13 पशु वैद्यकीय दवाखान्यांना आता पूर्णवेळ पशु धन विकास  अधिकारी मिळाले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहेत. 


धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे बीड जिल्ह्यात नुकतेच उपजिल्हाधिकारी दर्जाचे व कार्यकारी अभियंता दर्जाचे पूर्ण वेळ अधिकारी प्राप्त होऊन जिल्ह्यातील प्रभारी राज मोठ्या प्रमाणात संपुष्टात आले होते. त्या पाठोपाठ 13 ठिकाणी पशुधन विकास अधिकारी मिळाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.


बीड जिल्ह्यातील गंगामसला ता. माजलगाव येथील पशु वैद्यकीय दवाखाणन्यास डॉ. रणजित शेंगुळ, चौसाळा ता. बीड येथे डॉ. सुनील यादव, चकलंबा ता. गेवराई येथे डॉ. पंकज बहिरवाळ, गढी ता. गेवराई येथे डॉ. श्रुती भोसले, तलवाडा ता. गेवराई येथे डॉ. विकास अंबती, नेकनूर ता. बीड येथे डॉ. सचिन थोरात, मस्साजोग ता. केज येथे डॉ. दीक्षांत जोगदंड, नांदूर घाट ता. केज येथे डॉ. अभिषेक रंधवे, सादोळा ता. माजलगाव येथे डॉ. आकाश राऊत, सिरसाळा ता. परळी येथे डॉ. अरुण घोळवे, माजलगाव येथे डॉ. पल्लवी चव्हाण, टाकलसिंग ता. आष्टी येथे डॉ. प्रदीप नंदनवरे, चिंचोली माळी ता. केज येथे डॉ. प्राजक्ता भोळे या अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली असून शासकीय प्रक्रिया पूर्ण करून लागलीच रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....