इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा तिसऱ्या दिवशी लागला शोध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र,  या युवकाचा कोणताही पत्ता लागत नव्हता. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होते. अखेर आज सकाळी अकोला येथून बोलावलेल्या विशेष पथकाने  तलावातून या युवकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. तीन दिवसानंतर बेपत्ता युवकाचा शोध लागला आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्य...

MB NEWS-हळदी कुंकवाचे वाण; आत्मियतेचे स्वागत आणि आनंदाचा वसा; परळीत दैदिप्यमान व शानदार समारंभ(Video & News)

हळदी कुंकवाचे वाण; आत्मियतेचे स्वागत आणि आनंदाचा वसा; परळीत दैदिप्यमान व शानदार समारंभ



सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे व मुंडे कुटुंबियांचे मकरसंक्रांत हळदी कुंकू 


परळी (प्रतिनिधी) --- : परळी येथे मतदारसंघातील महिलांसाठी सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे, सौ. मनीषाताई अजय मुंडे, सौ. सरिताताई विजय मुंडे, सौ. अमृताताई रामेश्वर मुंडे, सौ. सोनालीताई अभय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकू समारंभाचे धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते. 








यावेळी परळी शहरासह परळी व अंबाजोगाई तालुक्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात या समारंभात हजेरी लावून हळदी कुंकू देत वाण लुटले. सलग दोन दिवस हा समारंभ उत्साहात सुरू होता.








परळीतील महिलांसाठी हळदी कुंकवासह विविध कार्यक्रम सौ. राजश्रीताई दरवर्षी आयोजित करत असतात, मात्र मागील दोन वर्षात कोविडच्या संसर्गामुळे हा कार्यक्रम घेता आला नव्हता. यावर्षी मात्र महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमास पाहायला मिळाला.








या समारंभात मुंडे कुटुंबियांसह राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. संगीताताई तुपसागर, तालुकाध्यक्ष सौ. कल्पना ताई आघाव, शहराध्यक्ष सौ. अर्चनाताई रोडे, शहराध्यक्ष सौ. पल्लवीताई भोईटे, पंचायत समिती सदस्य सौ. सुषमा ताई माऊली मुंडे यांसह असंख्य महिलांनी सहभाग घेतला.

       🏵️🏵️🏵️Video News 🏵️🏵️🏵️


🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

---------------------------------------- 

*MB NEWS ला YouTube वर नक्की Subscribe करा.* 🙏

---------------------------------------

https://youtu.be/jveT1uZfowA

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या