प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था समुपदेशक म्हणून चेतन सौंदळे यांची नियुक्ती

  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था समुपदेशक म्हणून चेतन सौंदळे यांची नियुक्ती

परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

जिल्हानिहाय मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे यांनी जारी केली असून औरंगाबाद बोर्डामार्फत परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी 16 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 12 तर बीड जिल्ह्यातील 4 समुपदेशकांचा समावेश आहे.बीड जिल्ह्यातील समुपदेशकामध्ये परळी तालुक्यातील नंदनज येथील श्री केदारी महाराज विद्या मंदिर या शाळेतील व सर्व परळीकरांना ज्ञात असलेले व्यक्तिमत्व श्री.चेतन अरविंद सौंदळे यांची मार्गदर्शक व समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


10 व 12 वि बोर्ड परिक्षेबाबत विद्यार्थ्यांना कोणते ही व कशा ही प्रकारे दडपण येत असेल त्यांनी निःसंकोचपणे 9422930599 या माझ्या मोबाईल क्रमांकावर फोन करावा

श्री.चेतन अरविंद सौंदळे
मार्गदर्शक व समुपदेशक,बीड
म.रा.शै.श.व प्र संस्था,पुण

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या