MB NEWS-वडखेल येथील शेतकऱ्याचा शॉक लागुन मृत्यू

 वडखेल येथील शेतकऱ्याचा शॉक लागुन मृत्यू


Click -⬛ *देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसीचे परळीत भाजपकडून दहन.

परळी वै( प्रतिनिधी)......

     तालुक्यातील वडखेले येथील शेतकरी पांडुरंग तुकाराम पोटे (वय ४५) यांचे रवीवारी (ता.१३) सकाळी अकरा वाजता शॉक लागुन मृत्यु झाला आहे. विज वितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यु झाला.

Click -🏵️ *अन् महाशिवरात्री नंतर परळीत भरली प्रासंगिक यात्रा....!* 

     शेतात कोळपणी करण्यासाठी पांडुरंग तुकाराम पोटे रवीवारी (ता.१३) सकाळी अकराच्या दरम्यान कोळपनीचे औजार गोळा करीत होते. कोळप लोखंडी होते. एक कोळप हातात तर दुसर कोळप खांदयावर घेउन स्वतःच्या शेतात ठेवताना हा अपघात घडला. हातातील कोळप खाली ठेवताना खांदयावरील कोळपची दांडी ताराला लागली . त्यात शॉक लागुन पांडुरंग पोटे यांचा जागीच मृत्यु झाला. जमीनी पासुन केवळ आठ फुट अंतरावर तारा असल्यानेच शेतकऱ्याचा मृत्यु झाला. शेतकऱ्याचा मृत्यु शॉक लागुन झाल्यानंतर दिवसभर प्रशासनाच्या कोणीही भेट दिली नाही. पोलीसांनी पंचनामा केलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Click -🏵️ *एका आवलिया 'योगी भक्ताची' परळीत येऊन 'संकल्पपुर्ती'.* _

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••







































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !