परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.२६ मार्च २०२२

 आजचे राशिभविष्य दि.२६ मार्च २०२२



मेष ः वैचारिक द्वंद्व निर्माण होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. सात्विकता महत्त्वाची आहे. कामांचे नियोजन आवश्यक. उपासना करावी.


वृषभ ः कृतकर्माचा पश्‍चाताप करण्याची वेळ येईल. ज्येष्ठांकडून कानउघाडणी होईल. नैतिकता महत्त्वाची आहे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.


मिथुन ः कामे मार्गी लागतील. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव राहील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. सामुदायिक सहलीचा आनंद घ्याल.


कर्क ः मनासारख्या घटना घडतील. नोकरी करणार्‍यांना लाभदायक दिवस ठरेल. पदोन्‍नतीचे योग. शत्रूंवर विजय प्राप्त कराल.

Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

सिंह ः एकाग्रतेच्या अभावामुळे अपयशाचा सामना करावा लागेल. व्यापारात नुकसानीची शक्यता. प्रेम प्रकरणात अडचणी येतील.


कन्या ः कामांचा वेग मंदावेल. पोटाचे विकार होण्याची शक्यता. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील.



तूळ ः आनंददायी दिवस जाईल. भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. नवे मित्र होतील. कलागुणांना वाव मिळेल.

 


वृश्‍चिक ः व्यावहारिक सावधानता बाळगा. महत्त्वाची कामे पुढे ढकला. आर्थिक नुकसानीची शक्यता. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.


धनु ः प्रसन्‍नता लाभेल. प्रयत्नांना यश मिळेल. कौतुकास्पद कार्य होईल. अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ घ्याल.


मकर ः अनावश्यक खर्च टाळावेत. वैवाहिक सौख्यात अडचणी येतील. वादविवादापासून दूर राहा. आर्थिक नुकसानीची शक्यता.


कुंभ ः सुवार्ता ऐकायला मिळेल. आप्तेष्टांच्या व मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यात दिवस जाईल. एकंदर आर्थिक प्रगती होईल.


मीन ः स्वप्नपूर्तीचा दिवस. आरोग्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस. प्रवासाचे योग. कौतुकास्पद कार्य कराल. योग्य दिशेने वाटचाल कराल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!