इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-संस्कृतीने मृत्यूनंतरचा जीवात्म्याचा प्रवास सुकर व्हावा यासाठी अनेक विधी आणि नामसाधना-ह.भ.प.संदिपान महाराज हसेगावकर

संस्कृतीने मृत्यूनंतरचा जीवात्म्याचा प्रवास सुकर व्हावा यासाठी अनेक विधी आणि नामसाधना-ह.भ.प.संदिपान महाराज हसेगावकर



परळी (प्रतिनीधी)भक्त देवाशी एकरूप होऊन गेल्यावर त्याला कुणी विचारले तर तो बोलतो मला माझेविषयी काहीच विचारू नका जे पुसायचे ते पांडुरंगाला माझ्यासंबधी विचारा असे बोलतो असे  प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे वैभव श्री ह.भ.प. संदिपान महाराज हसेगावकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या,"बोल अबोलणे मरोनिया जिणे|असोनि नसणे जनी आम्हा||१||भोगी त्याग जाला संगीच असंग 

| तोडियेले लाग माग दोन्ही||२||तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा| पुसणे ते पुसा पांडुरंगा||३||या अभंगावर कीर्तन करताना केले. 

Click:*'त्या' विवाहितेच्या आत्महत्येला कारणीभूत लोकांविरुद्ध परळीत गुन्हा; आरोपींवर कारवाईची भावाची आर्त मागणी*  


सेवानिवृत्त पोस्टमन कै.रावसाहेब आंधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त मंगळवार दि.5 एप्रिल रोजी दुपारी 2 ते 4 यावेळेत संत सावता महाराज मंदिर येथे कीर्तन झाले.

Click: परळी शिवारात विहिरीत आढळला मृतदेह*


        या कार्यक्रमास मृदंगाचार्य श्री गणेश महाराज उखळीकर, बालाजी महाराज भालेराव,तर गायनाचार्य संगीत विशारद श्री मनोहर महाराज डाबीकर,ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे,  दत्ता महाराज गडदे,रानबा महाराज फड, सुभाष महाराज चाटे,ऋक्षराज महाराज आंधळे मरळवाडी आणि मांडवा भजनी मंडळ यांनी साथ दिली. यावेळी ह.भ.प.संपत गीत्ते महाराज,श्री बंकटराव कांदे, भाजपा नेते श्री राजेश गित्ते , डॉ.संभाजी मुंडे, डॉ.अरुण गुट्टे, प्रल्हाद शेळके, प्राचार्य पांडुरंग महाराज तिडके,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमूख अभयकुमारजी ठक्कर आण्णा, प्राचार्य अतुल दुबे सर, खोपोलीचे युवा उद्दोजक शिवाजी पालाकुडतेवार, अश्विन मोगरकर, राजेंद्र ओझा,   शहाजी सिरसाठ महाराज, पत्रकार केशवराव मुंडे,पवन आघाव, वसंतराव गीत्ते( भाऊ) तसेच आप्तस्वकीय ग्रामस्थ व मित्रपरिवार तसेच पत्रकार मंडळी, भाविकांची कडक उन्हात  उपस्थिती भरगच्च होती.या प्रथम पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन अॅड.दत्तात्रय महाराज आंधळे,गोपाळ आंधळे व आंधळे परिवाराच्या वतिने करण्यात आले होते.

Click:*परळीत ६ मे रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभेचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा!* *_नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा_

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या