MB NEWS-प्रा. डॉ.सु. ब.काळे यांच्याकडून वैद्यनाथ महाविद्यालयास ग्रंथसंपदा भेट

 प्रा. डॉ.सु. ब.काळे यांच्याकडून वैद्यनाथ महाविद्यालयास  ग्रंथसंपदा भेट

     


    

 परळी वैजनाथ दि.२७-               

     येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालयाचे निवृत्त प्रा.व सामाजिक कार्यकर्ते  डॉ.श्री सु.ब. काळे (ब्रह्ममुनी) यांनी आपली अमूल्य ग्रंथसंपदा आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट केली आहे.  या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी व्ही मेश्राम, सेवानिवृत्त प्रा.डॉ सु. ब काळे,उपप्राचार्य  एस एम सूर्यवंशी, एस आर  सूर्यवंशी, डॉ मधुसुंदन काळे प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. डी के आंधळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा एम एल देशुमख यांनी डॉ काळे यांच्या कामगिरी, अध्यापन कार्याचा आढावा सांगितला. डॉ काळे यांनी वैद्यनाथ कॉलेज मधून बावीस वर्षांपूर्वी अध्यापन सेवेतून निवृत्त झाल्यावर देखील आयुष्यभर मोठ्या परिश्रमाने जतन केलेली वेद, उपनिषद, दर्शन, आयुर्वेद, योग, तत्वज्ञान व इतर विषयांची लाखमोलाची ग्रंथसंपदा आज एका कार्यक्रमात आपली ज्ञानदानभूमी असलेल्या वैद्यनाथ महाविद्यालयास सुपूर्त केली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.व्ही. मेश्राम यांनी  यावेळी डॉ काळे यांनी   या दुर्मिळ पुस्तकांचा योग्य तो  सदुपयोग व्हावा, वाचनाची परंपरा पुढेही नव्या पिढीत कायम रुजावी, अशी भावना व्यक्त करून करून वाचन परंपरा सर्वांमध्ये विकसित होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन केले. आपणच संकलित केलेले स्वतःचे विशाल असे ग्रंथालय आपल्याच महाविद्यालयास सुपूर्त करून त्यांनी एक नवा आदर्श उभा केला आहे. त्यानिमित्त त्यांचा ऋणनिर्देशपर सत्कार सोहळा संपन्न झाला. 

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

याप्रसंगी डॉ काळे यांनी मोठ्या प्रयत्नाने व परिश्रमातून संकलित केलेल्या ग्रंथाचे योग्य ते संगोपन व्हावे आणि प्राध्यापक,विद्यार्थ्यांनी या ग्रंथाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच या महाविद्यालयाने ज्ञानाची, गुणवत्तेची, तसेच त्याग व  समर्पणाची परंपरा पुढील पिढीने कायम ठेवावी, असेही आवाहन केले .या वेळी डॉ मधुसूदन काळे, यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात गणित विभागातील  प्रा. डॉ. गजभारे यांच्या लिखित ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा एस ए धांडे यांनी तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य,प्रा एस एम सूर्यवंशी यांनी मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

------------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*

Click & watch: 🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

क्लिक करा व वाचा:🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

Click: *परळीच्या कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व रासेयो विभागाचा उच्चतंत्र शिक्षणमंत्र्यांनी केला सन्मान*

क्लिक करा व वाचा:*वाढीव भागभांडवल: धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश*

Click & watch:🏵️ *सोलापूर तरुण भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बिनगुंडी यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*

Click: *परळीत सव्वा लाखाचा गुटखा पकडला*

-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.






-----------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा

जाहीरात/Advertis



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !