इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-पुण्यात नौकरीस असलेल्या युवकाची परळी तालुक्यातील आपल्या गावाकडे येऊन आत्महत्या

 पुण्यात नौकरीस असलेल्या युवकाची परळी तालुक्यातील आपल्या गावाकडे येऊन आत्महत्या



परळी - पुण्यात पीएमटी बससेवेत वाहक पदावर कार्यरत असलेल्या तरुणाने परळी तालुक्यातील अस्वलअंबा या मूळ गावी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी (दि.०५) दुपारी उघडकीस आली.


माधव प्रभाकर ढाकणे (वय ३५, रा. अस्वल अंबा) असे त्या मयत वाहकाचे नाव आहे. माधव ढाकणे पुण्यातील पीएमटी बससेवेत वाहक पदावर कार्यरत होते. दोन दिवसापूर्वीच ते गावाकडे आले होते. मंगळवारी सकाळी त्यांनी शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, त्यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. माधव ढाकणे यांच्या अकाली मृत्यूने परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या