MB NEWS-११ मे रोजी समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा

 ११ मे रोजी समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा



  साधुसतांच्या उपस्थितीत होणार नयनरम्य सोहळा

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.७-  

समर्थ प्रतिष्ठान द्वारा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे प्रतीवर्षा प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत होत असल्याने या सोहळ्याला अनन्य साधारण महत्व आहेच.त्या बरोबरच साधू-संतांची उपस्थिती व शिस्तबद्ध नियोजनामुळे हा उपनयन संस्कार सोहळा राज्यभरात प्रसिद्ध आहे.साधुसंतांची आशिर्वादपर उपस्थिती या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असते.

          Click: *Live Ambajogai -भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे भाषण*

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ज्या सोळा संस्कारांचा उल्लेख आहे त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे उपनयन संस्कार, प्रतिवर्ष नित्यनेमाने सामुदायिकरीत्या हा सोहळा समर्थ प्रतिष्ठान आयोजीत करत असते. यंदाच्या वर्षी ११ मे २०२२, मित्ती वैशाख शु १० शके १९४४ बुधवार रोजी सकाळी ११ वाजून ०३ मिनीटांच्या पावन मुहूर्तावर उपनयन संस्कार वैद्यनाथ दर्शन मंडप,परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे.या उपनयन संस्कारासाठी इच्छुकांनी बाळू महाराज जोशी उखळीकर मो- ९८२३४३०७०७,विशाल जहागीरदार (गोविंदा ट्रेडर्स,अंबाजोगाई) - ९४२३४७०७३५,राजेंद्र दगडगुंडे - ९५२७२५३३३३,नंदकुमार रामदासी- ९६८९०५६४८८, मनोज जब्दे(ओंकार शुभ मंगल सेवा,परळी) - ९४२०७८५३३१, प्रशांत औटी(एसबीआय समोर,परळी)- ९४२३४७२४७२ सचिन अग्निहोत्री -८२०८६८१७१०,शिरीष राजूरकर- ९४२१३३७००३,दिनेश लोंढे(आर्या ड्राय फ्रुईट्स,परळी) - ९९७५९३४७३० यांच्याकडे  मोठ्या संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन समर्थ प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

Click;*अंबाजोगाईतील ऊस व सोयाबीन उत्पादक शेतकरी मेळाव्यातील पंकजा मुंडे यांचे संपूर्ण भाषण.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार