MB NEWS-डॉ बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ स्वाभीमानाने पुढे घेऊन चला-पप्पु कागदे सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडेंनी स्वखर्चातुन उभारला आकर्षक देखावा

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ स्वाभीमानाने पुढे घेऊन चला-पप्पु कागदे



सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब आदोडेंनी स्वखर्चातुन उभारला आकर्षक देखावा 


परळी प्रतिनिधी 

महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमान दिला आहे,ख-या अर्थाने तरुणांनानी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची विचाराची चळवळ आपला स्वाभिमान कोठेही  गहाण न ठेवता पुढे घेऊन जाणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे यांनी परळी येथे उभारण्यात आलेल्या भव्य देखाव्याच्या प्रसंगी केले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमिताने सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडेंनी परळी येथील भिमवाडी चौक येथे संसद भवन,संविधान आणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती असलेला भव्य देखावा स्वखर्चातुन सादर केला आहे.या देखाव्याचे 13 एप्रिल रोजी अनावरण  रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे व विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

               👇 •Video News पहाण्यासाठी

खालील लिंक वर क्लिक करा•👇

🏵️ *•लक्षवेधक•* 🏵️ *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती:परळीत स्वखर्चाने उभारला आकर्षक देखावा.*

पप्पु कागदे अनावरण प्रसंगी पुढे बोलतांना म्हणाले कि,प्रथमता महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत घोषणा देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपला स्वाभीमान आहे,डॉ बाबासाहेबांची स्वाभीमानाची चळवळ ख-या अर्थाने तरुणांनी कोणाकडेही गहाण न ठेवता चालवली पाहिजे,इतरांकडुन वर्गणी न घेता आपल्यात ती धमक असली पाहिजे कि आपण स्व वर्गणीतुन फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांच्या प्रबोधनाची कार्यक्रम घेऊन तरुणांना प्रेरित केले पाहिजे.मुंबईत वरळी आणी मराठवाड्यात परळी हे पुर्वी ख-या अर्थाने निस्वार्थ चळवळीचे केंद्र होती.मला पुन्हा एकदा आभिमान वाटला परळीत बहुतांश ठिकाणी इतर राजकीय पुढाऱ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा बॕनरवर स्थान दिले गेले नाही आणी ते महापुरुषांच्या शेजारी अथवा बॕनरवर नसलेही पाहिजेत म्हणत भैयासाहेब आदोडे व भिमवाडी मिञ मंडळाचे पप्पु कागदे यांनी कौतुक केले.



सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडे यांनी प्रास्ताविकात म्हटले कि बीडच्या धर्तीवर आपणही परळीत स्वखर्चातुन काहीतरी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची अजुन व्याप्ती वाढावी यासाठी काहीतरी केले पाहिजे.विचाराअंती या देशात विविध जाती,धर्म व विविध परंपरा आहेत या सर्वांना एकसंघ जोडणारे भारतीय संविधान माझ्या डॉ बाबासाहेबांनी दिले आहे तेव्हा त्याची प्रकृती असलेली संसद भवन,भारतीय संविधान व संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य असा देखाव्यातुन तरुणांना प्रेरणा मिळेल या भावनेतुन हा देखावा सादर केला आहे.आकर्षक रोषनाईने सादर केलेला हा देखावा आपण पुढे दहा दिवस भिमवाडी चौकात स्थायी असणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडे यांनी सांगितले.

या अनावरण कार्यक्रमाला रिपाई युवा प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे,परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्यअभियंता मोहन आव्हाड,पोनि.सुरेश चाटे,नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,मुप्टा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे, नगरसेवक सचिन कागदे, पोउनि ठाकुर,वैद्यकिय अधिक्षक डॉ अरुण गुट्टे,रिपाउ नेते आर.एच.व्हावळे,विश्वनाथ गायकवाड,सुनिल चिकाटे,संजय गुट्टेसर,राम गायकवाड,शरद मगर,विलास वारभवन ,दत्ताभाऊ देशमुख अदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडे व भिमवाडी मिञ मंडळाचे राहुल गोदाम, यशपाल मुंडे,विजयानंद व्हावळे,रमेश रायभोळे,शरण मस्के,राहुल इंगळे,विश्वनाथ रायभोळे,कपिल गायकवाड,सचिन रोडे,धम्मपाल गोडबोले, संघपाल भोकरे,आकाश आदोडे,आदित्य वंजारे,प्रतिक मस्के,संतोष गायकवाड,बुध्दानंदन व्हावळे,आदर्श मस्के,बिंदुसार रोडे,नागसेन रोडे,सुधीर रोडे,वैभव भोकरे सुमीत  रायभोळे यांनी प्रचंड मेहनतीतुन हा देखावा सादर केला असुन याच सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

Click:🏵️ *MB NEWS चे संचालक संपादक मा.श्री.महादेवजी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!*


⬛ *पहा: उद्या रिलीज होणारे सौंदरमल माता-कन्येने गायिलेले "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा" संपूर्ण गीत....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


Click:*पंकजाताई मुंडेंनी 'त्या' गुणी गायिकांच्या कलेला दिला वाव !* *महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शामल सौंदरमलच्या गीताचा व्हिडिओ राज्यात व्हायरल*


Click:*प्रकृती स्थिर-विश्रांतीचा सल्ला : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा त्रास; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार*

Click:*दगदगीमुळे भोवळ आली: धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार* _मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केली दूरध्वनीवरून चौकशी, सुप्रियाताई सुळे, दत्ता मामा भरणे पार्थ दादा पवार आदींनी घेतली भेट_


Click:पंकजाताई ,भुजबळ, शिंगणे, पेडणेकर आदी नेते पोहचले धनंजय मुंडेंच्या भेटीला

Click:*भेटीनंतर बहिण पंकजा मुंडे यांनी दिली धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती*

Click &watch:🏵️ *भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलला "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा"हे महामानवाच्या चरणी समर्पित असलेले गीत रिलीज होणार आहे.* *या गीताला व गायिकांना महाराष्ट्रासमोर आणतांना पंकजा मुंडेंनी केलं 'हे' आवाहन.* *🔸 click करा व नक्की बघा👇👇

जाहीरात/Advertis




---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

-----------------------------
















🔸 MB NEWS/माझी बातमी🔸

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?