MB NEWS-परळीत चोऱ्यांचे सत्र सुरूच; थर्मलमध्ये चोरी तसेच तहसील समोरुन एक व पांगरीकॅम्प येथून एक अशा दोन मोटरसायकलींची चोरी

 परळीत चोऱ्यांचे सत्र सुरूच; थर्मलमध्ये चोरी तसेच तहसील समोरुन एक व पांगरीकॅम्प येथून एक अशा दोन मोटरसायकलींची चोरी



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

        परळी शहर व तालुक्यात चोरांचा सुळ्सुळाट अद्यापही थांबलेला नाही. दररोज चोरीच्या घटनांच्या नोंदी पोलिसात सातत्याने होताना दिसत आहेत. त्यामुळे चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. थर्मल मध्ये पुन्हा एकदा साहित्याची चोरी झाली आहे. तर तहसील कार्यालयासमोर लावलेली एक मोटर सायकल आणि पांगरी कॅम्प येथून एका मोटर सायकलची चोरी झाल्याच्या नोंदी पोलिसात करण्यात आलेल्या आहेत.

Click:🏵️ *आत्मिय सन्मान: परळीत कर्नाटकच्या तीन 'खास' पाहुण्यांचा विशेष पाहुणचार.*

           याबाबत अधिक माहिती अशी की थर्मलचे कनिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल केली असून यामध्ये सात हजार सातशे रुपयाचे सीएचपी कन्व्हर बेल्ट रोलर 11 नगर चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे तर दुसऱ्या दोन घटनात पांगरी कॅम्प येथून फिर्यादी सखाराम हरिभाऊ मुंडे राहणार लिंबोटा यांची तीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची नोंद ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे.  दुसर्‍या घटनेत तहसील कार्यालयासमोर लावलेली फिर्यादी बालाजी ऋषिकेश दहिफळे राहणार शिक्षक कॉलनी परळी यांची वीस हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली म्हणून फिर्याद नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणांचा तपास पोलिस करीत आहेत.

Click:🏵️ *गुढीपाडव्यानिमित्त नागापुर येथे श्री. नागनाथ प्रभूंचा पारंपरिक पालखी सोहळा उत्साहात.

            दरम्यान परळी शहर व तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असे या नोंदीवरून दिसून येते. मोटर सायकलींच्या चोरी ने नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोऱ्यांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी तत्पर कारवाई करावी अशी नागरिकांची माफक अपेक्षा आहे.

Click:🏵️ *गुढी उभी करतांना आरती कोणती म्हणायची? जाणुन घ्या:* 🔸 *गुढीची आरती..* 🔸

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click &read: 🏵️ *27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे यांनी लिहिलेला लेख.*

क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*

Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*

🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*

*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*

🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis




---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

-----------------------------
















---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
---------------------------------------------










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !