इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-पंकजाताई मुंडेंचा एक फोन अन् कोरेगांवच्या 'त्या' चिमुकल्यांना मिळाली अंगणवाडीची इमारत

 पंकजाताई मुंडेंचा एक फोन अन् कोरेगांवच्या 'त्या' चिमुकल्यांना मिळाली अंगणवाडीची इमारत



जागरूक पालकाच्या ट्विटची त्वरेने दखल ; पंकजाताईंच्या सूचनेनंतर बीडीओंची गावास भेट



इमारत होईपर्यंत बालकांना तात्पुरता निवारा मिळणार


बीड  । दिनांक २०। 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्यातील नेतृत्व गुणाची चुणूक पुन्हा एकदा दिसून आली, त्यांच्या एका फोनमुळे कोरेगांव (ता. केज) येथील बालकांना अंगणवाडीच्या इमारतीसाठी एक लक्ष ६७ हजाराचा निधी पंचायत समितीने तातडीने उपलब्ध करून दिला. इमारत होईपर्यंत तात्पुरता निवाराही प्रशासनाने चिमुकल्यांना दिला, जेणेकरून त्यांना उघड्यावर बसावे लागणार नाही. पंकजाताईंनी केलेल्या कार्यवाहीबद्दल पालकांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.


   झाले असे, कोरेगांव ता. केज येथील जागरूक नागरिक श्री उमाकांत तांदळे यांनी पंकजाताई मुंडे यांना १८ जूलै रोजी एक ट्विट करून उघड्यावर बसून शिक्षण  घेणाऱ्या बालकांची व्यथा मांडली.   "गावांत लहान मुलांसाठी बालवाडी व अंगणवाडीची इमारत नसल्याने आमच्या गावांतील लहान बालके हे उघड्यावर शिक्षण घेत आहेत, आपल्याकडून काही मदत झाली तर विद्यार्थ्यांची गैरसोय वाचेल" असं ट्विट त्यांनी केलं. पंकजाताईनी लगेच याची दखल घेत त्यांना लगेच रिप्लाय केला. " मी फंड मंजूर करून देते प्रक्रियेसाठी वेळ लागेल, तोपर्यंत एखादी शाळा खोली किंवा इतर व्यवस्था पहावी असे बीडीओंना  सांगते..दोन दिवसात बीडीओ भेट देतील" असे सांगून केज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मोराळे यांना फोन केला व याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली.


    गट विकास अधिकारी मोराळे यांनी सकाळीच कोरेगांव येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि लोकल सेस फंडातून १ लक्ष ६७ हजाराचा निधी उपलब्ध करून दिला. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीला त्याचे प्रशासकीय मान्यतेचे पत्रही सुपूर्द केले. या निधीतून लगेचच अंगणवाडीच्या इमारत बांधकामाला सुरवात होणार आहे. इमारत होईपर्यंत बालकांना उघड्यावर बसून शिक्षण घेता येऊ नये यासाठी तात्पुरता निवारा करून देण्यात येत आहे. पंकजाताईंनी तातडीने दखल घेत चिमुरड्यांची सोय करून दिल्याबद्दल पालकांनी त्यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या