युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त परळीत अभिवादन

 ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल  दर्डा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त परळीत अभिवादन 



परळी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व लोकमत समूह संस्थापक आध्यक्ष स्वर्गीय जवाहरलाल बाबुजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष दोन जुलै पासून सुरू झाले  त्यानिमित्त परळीत  लोकमत परिवाराच्या वतीने जवाहरलाल बाबुजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पाहार घालून पुष्पांजली अर्पण करण्यात आली ,व अभिवादन करण्यात आले ,यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबूजीं च्या कार्यास उजाळा देण्यात आला,

     


  

      लोकमत समूह संस्थापक आध्यक्ष स्वर्गीय जवाहरलाल बाबुजी दर्डा यांनी सुरू केलेला लोकमत राज्यभर जेथे एस टी तेथे  पोंहचला असून महाराष्ट्र बाहेर दिल्ली व गोवा येथे ही लोकमत चा झेंडा फडकत असल्याचे यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले  ,शनिवारी  येथील गुरुकृपा नगर भागातील मराठवाडा साथी  सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला .श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख,माजी सचिव व विश्वस्त प्रा बाबासाहेब देशमुख, परळी चे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,अ .भा जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य विजय वाकेकर,व्यापारी महासंघाचे आध्यक्ष माऊली फड,मराठवाडा साथी चे संपादक सतीश बियाणी,महाराष्ट्र राज्य एस बी सी संघर्ष समितीचे राज्य उपाध्यक्ष विलास ताटे,भाजप चे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा,हभप रामेश्वर कोकाटे ,राष्ट्वादी चे परळी शहर सरचिटणीसअनंत इंगळे,भाजपचे युवा नेते अश्विन मोगरकर,नितीन समशेटे,नगरसेवक गोपाळराव आंधळे,ऍड अरुण पाठक,योगेश पांडकर, मनसे चे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष ऋषिकेश बारगजे,एस टी चे सेवा निवृत्त कर्मचारी राजाभाऊ देशमुख, वीज वितरणचे सेवा निवृत्त कर्मचारी किशोर झरकर, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे सदस्य सखाराम आदोडे,गित्ते,पत्रकार विजय हमीने,प्रशांत जोशी,ओमप्रकाश बुरांडे,मोहन वाव्हळे,संतोष जुजगर, धनंजय आरबुने गदीश शिंदे,श्रीकांत जोशी,महेश शिवगण,गोपीनाथ कांगने ,पद्माकर उखळीकर ,जयराम गोंडे व  लोकमत वितरक उद्धव हाडबे इतर मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन लोकमत प्रतिनिधी संजय खाकरे यांनी केले,

🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा: 'त्या' व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर

क्लिक करा: *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे

क्लिक करा:*एकनाथ शिंदेची देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने,"म्हणाले....*

क्लिक करा:*थक्क करणारा प्रवास: रिक्षाचालक ते मुख्यमंत्री*

क्लिक करा:*एकनाथ शिंदे होणार नवे मुख्यमंत्री*

क्लिक करा:*अखेर उद्धव ठाकरेंनी दिला राजीनामा*

क्लिक करा:🔴 🥏 *शिवसेनेला आणखी एक धक्का*

क्लिक करा:🔴 🛑 वारीतील वारकर्‍यांना सध्याच्या राजकीय घडामोडींशी ना देणं ना घेणं........!


क्लिक करा:🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......!

क्लिक करा:🔴 🟥 *पुन्हा ठाकरे -शिंदे एकत्र?*


क्लिक करा:बंडखोर गटाचं नाव ठरलं: 'शिवसेना बी' - शिवसेना बाळासाहेब


• क्लिक करा:🔴विठ्ठलभक्तीने दुमदुमला बालाघाट। जाहली सोपी वाट । पंढरीची ।।

• क्लिक करा:💢 स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा,उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल


*...तर दांडे हातात घेऊ- आबासाहेब पाटील*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या