MB NEWS- *ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे आ. धनंजय मुंडेंकडून स्वागत* *ओबीसींच्या भावना जपण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचेच आभार - धनंजय मुंडे*

 *ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे आ. धनंजय मुंडेंकडून स्वागत*



*ओबीसींच्या भावना जपण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचेच आभार - धनंजय मुंडे*


परळी (दि. 20) - महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाच्या शिफारसी स्वीकारून सर्वोच्च न्यायालयाने आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 27% ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे, या निर्णयाचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी स्वागत केले आहे. 

Click &watch:धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया(video)

महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाने सादर केलेल्या अहवालासह ट्रिपल टेस्ट व अन्य बाबी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या असून, ओबीसींच्या 27% पर्यंत मर्यादेतील आरक्षणासह निवडणुका 2 आठवड्यात जाहीर कराव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज जाहीर केला आहे. 


क्लिक करा व वाचा:*आतुरतेने प्रतिक्षा करणाऱ्या ओबीसींना न्याय मिळाला* _*पंकजाताई मुंडे यांनी केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत*_


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व वैयक्तिक आम्ही देखील ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका नकोत, किंवा त्या घेतल्याच तर आम्ही निवडणूक लढवत असलेल्या ठिकाणी 27% जागा ओबीसी उमेदवारांना देऊ, अशी भूमिका यापूर्वीच घेतली होती. त्यामुळे आज या निकालाचा आनंद आहे, पक्षस्तरावर व व्यक्तिगत रित्या मी या निकालाचे स्वागत करतो, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

क्लिक करा व वाचा: ■ *मोठी बातमी:ओबीसी आरक्षणासह निवडणूक घ्या-सर्वोच्च न्यायालय*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार