इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-मोठी बातमी:ओबीसी आरक्षणासह निवडणूक घ्या-सर्वोच्च न्यायालय

 मोठी बातमी:ओबीसी आरक्षणासह निवडणूक घ्या-सर्वोच्च न्यायालय



नवी दिल्ली- ओबीसी आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारला अन ओबीसींना मोठा दिलासा मिळाला आहे.सर्वोच्च न्यायालयाने येत्या दोन आठवड्यात ओबीसी आरक्षणासह निवडणूक घ्या असे आदेश दिले आहेत.बांठिया आयोगानुसार आरक्षण देऊन निवडणूक घेण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे.


राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षण प्रकरणात गेल्या दोन अडीच वर्षापासून वाद विवाद सुरू होता.सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयाने आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणूक जाहीर केल्या होत्या.परंतु दरम्यानच्या काळात राज्यातील महाविकास आघाडी सरकार बदलले अन शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले.त्यानंतर 20 जुलै रोजी याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

या सुनावणी नंतर न्यायालयाने बांठिया आयोगानुसार दोन आठवड्यात निवडणूक घ्या असे निर्देश दिले आहेत. ओबीसी समाजासाठी हा मोठा महत्वपूर्ण निर्णय आहे,या निर्णयामुळे आता पुढील पंधरावीस दिवसात निवडणुका होतील अशी अपेक्षा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या