नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

MB NEWS-भीषण अपघात : दोघे जागीच ठार तर दोन गंभीर जखमी

 भीषण अपघात : दोघे जागीच ठार तर दोन गंभीर जखमी



केज :-  उभ्या ट्रक शेजारी उभ्या असलेल्या दोघांना एका कारने चिरडून झालेल्या अपघातात दोघांचा  जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

      अंबाजोगाईकडून केजच्या दिशेने येत असलेला राजस्थान येथील ट्रक क्र. (आर जे-११/जी बी-१०८६) हा चंदनसावरगाव येथील बस स्टँडवर रस्त्याच्या कडेला थांबला होता. ट्रकचे ड्रायव्हर व क्लिनर हे खाली उतरून ट्रकच्या टायर मधील हवा तपासून पहात होते. त्या वेळी अंबाजोगाईकडून केजकडे येत असलेली कार क्र. (एम एच-४४/०५१२) ने रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर याना कारने चिरडले.हा आपघात आज दि. १९ जुलै मंगळवार रोजी रात्री ८:०० वा. च्या दरम्यान घडली. या अपघातात उत्तर भारतीय ताहेर हुसेन आणि इस्माईल हे दोघे ट्रक ड्रायव्हर व क्लिनर जागीच ठार झाले. त्यांना चिरडून नंतर ती कार रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात गेली. दोघांना चिरडलेल्या कार मधील प्रदीप अर्जुन मुंडे आणि रवि दिलीप मुंडे दोघे रा. गोपाळपूर ता. धारूर हे जखमी झाले आहेत.जखमींना उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी आणले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या