MB NEWS -दुःखद वार्ता वैद्यनाथ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रकाश कुसुमकर यांचे निधन

 दुःखद वार्ता: वैद्यनाथ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रकाश कुसुमकर यांचे निधन



परळी वैजनाथ

श्री वैद्यनाथ विद्यालय प्राथमिक विभागाचे माजी मुख्याध्यापक प्रकाश विठ्ठलराव कुसुमकर गुरुजी यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

जुन्या गावभागतील श्री वैद्यनाथ विद्यालय प्राथमिक विभागाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश विठ्ठलराव कुसुमकर गुरुजी ( वय 70 वर्ष)यांचे आज शुक्रवार दि 29 जुलै 2022 रोजी छातीत तीव्र कळ आल्याने परळी येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु तीव्र ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांची दुपारी 3 वाजता प्राणज्योत मालवली.  

दिनदयाळ बँक, शाखा लातूर चे शाखाधिकारी आशिष कुसुमकर यांचे वडील व पत्रकार अनुप कुसुमकर यांचे काका होत. प्रकाशराव कुसुमकर गुरुजी यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !