इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-आतुरतेने प्रतिक्षा करणाऱ्या ओबीसींना न्याय मिळाला* *पंकजाताई मुंडे यांनी केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत*

*आतुरतेने प्रतिक्षा करणाऱ्या ओबीसींना न्याय मिळाला* 

*पंकजाताई मुंडे यांनी केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत*  



मुंबई । दिनांक २०।
राजकीय आरक्षणाची आतुरतेने प्रतिक्षा करणाऱ्या तमाम ओबीसी वर्गाला न्याय मिळाला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.


   ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या निर्णया संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयाने आरक्षणाच्या निर्णयाला मान्यता दिल्याने ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात ट्विट करत पंकजाताईंनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. "ओबीसी आरक्षण... स्वागत स्वागत स्वागत... आतुरतेने प्रतीक्षा करणार्‍या समस्त ओबीसींना न्याय..राजकीय भविष्यावरील टांगती तलवार दूर..सरकारचे आभार...आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत..." असं ट्विट त्यांनी केलं आहे.
••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या