इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-परळीकरांना जलक्रीडेचा आनंद देणारा चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरला !

 परळीकरांना जलक्रीडेचा आनंद देणारा चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरला !


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     परळी तालुक्यातील लघुतलावांपैकी एक व परळी शहरापासून जवळच असलेला चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरला आहे.परळीकरांना जलक्रीडेचा आनंद देणारा चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.तसेच या तलावाखालील सिंचन क्षेत्रात या जलसाठ्याचा लाभ होणार आहे.

           परळी शहरात लहान मुले व युवकांना पोहण्यासाठी स्विमिंग पूलच नाही. शहरापासून जवळच सात किलोमीटर अंतरावर असलेला चांदापुर चा तलाव आहे.  त्यामुळे शहरातील नागरिकांनी या तलावालाच स्विमिंग पूल केलेले आहे. सकाळी पाच पासून ते दहा अकरा वाजेपर्यंत या तलावावर  नागरिक आपल्या बच्चे कंपनीला घेऊन या तलावावर गर्दी करतात. यावर्षी धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे . त्यामुळे हा लघुतलाव आता पुर्ण भरुन ओसंडून वाहत आहे. या ठिकाणी पोहण्यासाठी जाणार्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या