युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 संजय गोरे यांचा सत्कार



परळी वै.ता.३० प्रतिनिधी


     शिक्षण व शिक्षकांच्या प्रश्नावर संघर्षरत असलेल्या मराठवाडा शिक्षक संघाच्या शहराध्यक्षपदी संजय गोरे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त संचालक असलेल्या श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पत संस्थेच्या वतीने संजय गोरे यांचा सत्कार करण्यात आला.

      नुकतीच मराठवाडा शिक्षक संघाची परळी शहर व तालुका कार्यकारीणी निवडण्यात आली आहे. शहराध्यक्षपदी शिक्षक चळवळीत सक्रीय असलेले शिक्षक संजय गोरे यांची परळी शहराध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. निवडीबद्दल संजय गोरे यांचा परळी येथील श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष पवनकुमार जैस्वाल व सचिव लक्ष्मण वाकडे यांनी मंगळवारी (ता.३०) पतसंस्थेच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. गोरे पतसंस्थेचे विद्यमान संचालक आहेत. यावेळी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सुनिता वाघमोडे, संचालक अक्षय मुंडलिक, राजाभाउ आढाव, सचिन मुंदडा, राजेश्वर निला, सुवर्णा जंगले, सुमन चव्हाण, व्यवस्थापक प्रकाश चव्हाण, कर्मचारी बसवेश्वर खोत, पिग्मी एजंट विष्णु लिखे, रमेश बागवाले, वैजनाथ चव्हाण, राजेश शेटे, प्रदिप राठोड, विकास उडाणशिव, मनोज महाजन यांची उपस्थीती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या