वैद्यनाथ बँकेत गणरायांचे आगमन!



परळी (प्रतिनिधी)

परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ अर्बन को ऑप बँकेच्या मुख्य शाखेत श्री गणरायांचे थाटामाटात आगमन झाले. बँकेचे व्हा. चेअरमन रमेशराव कराड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुचिता रमेशराव कराड यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली.


भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी वैद्यनाथ बँकेत गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षीही विधिवत श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. रमेशराव कराड व सौ. सुचिता कराड यांच्या हस्ते पहिल्या दिवशीची स्थापना पूजा संपन्न झाली. यावेळी बँकेचे सर्व संचालक, पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!