इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील समूह राष्ट्रगीत गायनात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग 



परळी(प्रतिनिधी)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त माजी विद्यार्थी संघ व पत्रकार बांधवांच्या वतीने बुधवार दि.17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे  समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन केले होते. यावेळी व्यापारी, पत्रकार, माजी विद्यार्थी व परळीकर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सामुहिक राष्ट्रगीत गायनात सहभाग नोंदविला. 

माजी विद्यार्थी संघ व पत्रकार बांधवांच्या वतिने स्वराज्य महोत्सवाच्या अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त सामुहिक राष्ट्रगीत गायन घेण्यात आले. सकाळी 11 वाजता  राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे शहरातील पत्रकार बंधू, व्यापारी, माजी विद्यार्थी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व परळीकर नागरिकांनी एकत्र येत समूह राष्ट्रगीत गायन केले. राष्ट्रगीतानंतर भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सामूहिक राष्ट्रगाणापूर्वी राणी लक्ष्मीबाई टॉवर वरील सायरन वाजवून नागरिकांना राष्ट्रगीतासाठी सूचित केले गेले होते. राष्ट्रगीतादरम्यान मुख्य चौक असलेल्या टॉवर चौकातील वाहतुक स्तब्ध होऊन प्रत्यकाने जागेवर उभे राहून राष्ट्रगीत गायनात सहभाग नोंदवला. यावेळी आयोजक पत्रकार मोहन व्हावळे व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अश्विन मोगरकर यांच्यासह ओमप्रकाश सारडा,राजेंद्र ओझा, प्रशांत जोशी, संजय खाकरे, रामप्रसाद गरड, आत्मलिंग शेटे, धनंजय आढाव, प्रकाश चव्हाण, धनंजय आरबुने, दत्ता काळे, धीरज जंगले, सचिन भांडे, कुमार व्यवहारे, विकास वाघमारे, रोहिदास बनसोडे, , शेख हुमायुन, योगेश पांडकर, अरुण पाठक, अमोल डुबे,  गोविंद चौरे, रामेश्वर महाराज कोकाटे, अतिष आदोडे, मुकेश काबरा, गोविंद चांडक,गजानन चौंडे,,मयुर मुळजकर,राहुल केंद्रे, नानावटे, जयराम गौंडे,भालचंद्र तांदळे,बंटी अग्रवाल,मनोहर मुंडे ,विजय रोडे,आदी परळीकर नागरिक उपस्थित होते.

----------------------------------------------------------

Click: *घरफोडी:दीड लाखाची रोख रक्कम चोरली*

Click: *सावधान: ओटीपी विचारून दीड लाखाचा गंडा*

Click:*भाजप संसदीय मंडळातून नितीन गडकरी बाहेर तर केंद्रीय निवडणूक प्रचार समितीत देवेंद्र फडणवीस*

Click:*राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील समूह राष्ट्रगीत गायनात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग*

Click:*श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार*

Click:*परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन*

Click:● *वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान:आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरुन धनंजय मुंडेंनी ठणकावून सांगितले......* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

■ VIDEO News ■

--------------------------------------------

Click:  ■ *LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी*

Click :■ *१५ आँगस्टला घरी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे नंतर करायचे काय ?*

■ VIDEO News ■





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!