अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची परळीत बिंगोवर कारवाई 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

      अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने परळीत बिंगो जुगार खेळणाऱ्या व खेळणाऱ्या वर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

      याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार ,परळी शहरातील मलिकपुरा भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन बिंगो नावाच्या जुगार खेळताना व खेळवताना आढळून आले म्हणून अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने धडक कारवाई केली. यात चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोपींकडून सुमारे 42070 रु. ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पो.ना. तानाजी तागड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पो.ना. गुट्टे हे करीत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार