MB NEWS-मुख्याध्यापक संघ सोनपेठ तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक रामदास मुंढे यांचा मायभूमीत सत्कार

 मुख्याध्यापक संघ सोनपेठ तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक रामदास मुंढे यांचा मायभूमीत सत्कार


गंगाखेड, प्रतिनिधी....
  परभणी जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सोनपेठ तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक रामदास मुंडे यांचा पिंपळदरी या त्यांच्या मायभूमीत ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला.



ग्रामपंचायत कार्यालय पिंपळदरी यांच्यावतीने गावातील नामवंत व्यक्तिमत्व व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सोनपेठ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रामदास मुंढे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती गंगाखेडचे उपसभापती तथा सेवा सहकारी सोसायटी पिंपळदरी चे चेअरमन व सरपंच पंडितराव मुंढे हे होते. कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाई ज्ञानोबा मुंढे यांची विशेष उपस्थिती होती. 




    या सत्कार सोहळ्यात संत जनाबाई शिक्षण संस्थेचे सचिव एडवोकेट संतोष मुंढे, सेवानिवृत्त डिवाएसपी सुदर्शन मुंढे, सेवानिवृत्त डी वाय एस पी वालचंद मुंढे, सेवानिवृत्त डी वाय एस पी शिवशंकर मुंढे, वकील संघ तालुकाध्यक्ष एडवोकेट सुधीर मुंढे, पत्रकार संघ तालुकाध्यक्ष उद्धव चाटे, नवोदय प्रवेश पात्र परीक्षा कुशल मार्गदर्शक तुकाराम सूर्यवंशी, एमबीबीएस यशस्वीपणे पूर्ण केलेल्या कु. क्रांती मुंढे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बारावी परीक्षेतील गुणवंत ,दहावी परीक्षेतील गुणवंत, नवोदय पात्र विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशवराव मुंढे गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभम पंडितराव मुंढे यांनी केले. कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------------------------------

विनंती:  MB NEWS  चे  युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. खालील लिंकवर क्लिक करून बेल आयकाॅन दाबा.👇👇👇👇
-------------------------------------------------------

Video News :


Clik: ■ *आज दुपारी चार वाजता आर्य समाज मंदिरात संस्कृत दिन समारोह*


Click &watch:■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*



Click &watch:*परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*

Video News :


Click: *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*


Click:*मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषणाची वेळ* • _पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार_


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !