युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-आज दुपारी चार वाजता आर्य समाज मंदिरात संस्कृत दिन समारोह

 आज दुपारी चार वाजता आर्य समाज मंदिरात संस्कृत दिन समारोह 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

       आज दिनांक 11 रोजी सायंकाळी चार वाजता आर्य समाज मंदिर परळी वैजनाथ येथे सामूहिक संस्कृत दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

      दरवर्षी संस्कृत अध्यापक व संस्कृत भाषा प्रेमींच्या वतीने परळीत सामूहिक संस्कृत दिन साजरा केला जातो.  आज दिनांक 11 रोजी सायंकाळी चार वाजता आर्य समाज मंदिर येथे संस्कृत दिन समारोह होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून भेल सेकंडरी स्कूल चे शालेय समिती अध्यक्ष श्री वसंतराव देशमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आर्य समाज परळीचे प्रधान जुगलकिशोर लोहिया उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रसिद्ध वेद प्रचारक पं. श्री. रामनिवास गुणग्राहक, पं. श्री. उदयवीर आर्य प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

    या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन  संयोजक अग्रसेन राठोड, सहसंयोजक प्रशांत कुमार शास्त्री ,प्रायोजक जयपाल लाहोटी आदींनी केले आहे

--------------------------------------------------------

Video News :


Click &watch:■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*



Click &watch:*परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*

Video News :


Click: *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*



Click:*मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषणाची वेळ* • _पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार_





--------------------------------------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या