इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मनोभावे घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

 महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मनोभावे घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी

          महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज शुक्रवारी बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. दुपारी अंबाजोगाईत त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण मंडळ व रेड क्रॉस सोसायटी यांच्या अधिकाऱ्यासमवेत बैठक घेतली. योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर परळी वैजनाथ येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे पूजन करून त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. राज्यपालांचा आजचा मुक्काम परळी वैजनाथ येथेच असणार आहे.


          महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी हे आज दिनांक 19 रोजी अंबाजोगाई येथून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास परळीत दाखल झाले .४.२० वाजता त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात दाखल होत मनोभावे पूजाअर्चा करून श्रावण पर्वकाळात प्रभूवद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने राज्यपालांचा हृदय सत्कार करण्यात आला.  वैद्यनाथाची प्रतिमा देऊन राज्यपालांचा यावेळी देवस्थान कमिटीने सत्कार केला. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेश देशमुख,प्रा. प्रदीप देशमुख, प्रा.बाबासाहेब देशमुख, विजयकुमार मेनकुदळे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, नंदकिशोर जाजू, नागोराव देशमुख, रघुवीर देशमुख, जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा,जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ, यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या