इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-नंदनज येथे रा . से . यो. चे हर घर तिरंगा जनजागरण अभियान वैद्यनाथ कॉलेज, जि . प . प्रा . शाळा, केदारी महाराज विद्या मंदिर शाळा सहभाग

 नंदनज येथे रा . से . यो. चे हर घर तिरंगा जनजागरण अभियान


वैद्यनाथ कॉलेज, जि . प . प्रा . शाळा, केदारी महाराज विद्या मंदिर शाळा सहभाग


परळी -वै : -  तालूक्यातील नंदनज येथे राष्ट्रीय सेवा योजना , वैद्यनाथ कॉलेज, ग्राम पंचायत नंदनज, जि . प . प्राथमिक शाळा, केदारी महाराज विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने चला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू १३ ते १५ ऑगस्ट घरो घरी तिरंगा फडकवू य-  हर घर तिरंगा जनजागरण अभियान दि . ११ ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न झाले . या रॅलीची सुरुवात वैद्यनाथ कॉलेज परळी येथून छ्त्रपती शिवाजी महाराज चौक , बस स्टँड, शक्ती कुंज वसाहत मार्गे नंदनज गावाच्या वस्ती - वस्ती घरो- घरी- तिरंगा मोहिमेच जनजागरण केले . या रॅलीचे उद्घाटन प्राचार्य डॉ . डी . व्ही . मेश्राम, सरपंच अनिल गुट्टे, प्रा . डॉ . माधव रोडे,  उपसरपंच हनुमंत गुट्टे , प्रा . उत्तम कांदे, ग्रामसेवकी पुनम गाडे,  यांच्या हस्ते झाले . या कार्यक्रमात ४०० विद्यार्थीना सहभाग घेतला त्यात १५० मुली व २२५ मुलांनी सहभाग घेतला .   यावेळी एन . एस.एस. वैद्यनाथ कॉलेजच्या वतीने फळांचा आहार  मुख्यध्यापक सुनिल गर्जे, मुख्यध्यापक मिरा राऊत , यांच्या हस्ते सफरचंद फळाचे वाटप सर्वाना करण्यात आले .  प्रा . मनोज कांबळे,  प्रा . भिमानंद गजभारे, प्रा . रा . पी . गोरे,  प्रा . डॉ . व्ही . एल .  फड, प्रा . सदानंद लोंखडे, प्रा . उमकांत कुरे, प्रा . दिलीप गायकवाड,प्रा . मारूती मोकळे, ज्योति चाटे मॅडम, नागरगोजे सर, फड सर, व्हावळे सर, राम गुट्टे, अंकुश गुट्टे, देविदास गुट्टे, बिभषण गुट्टे, माणिक गुट्टे, मोतीराम गुट्टे अदि . सहभाग घेतला .  या कार्यक्रमाचे अयोजन रासेयो वैद्यनाथ कॉलेज प्रा . माधव रोडे, मुख्यध्यापक  मिरा राऊत मॅडम , मुख्यध्यापक सुनिल गर्जे, प्रा . दिलीप गायकवाड,  ग्रामपंचायत नंदनज,  यांच्या वतीने करण्यात आले .


-------------------------------------------------------

विनंती:  MB NEWS  चे  युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. खालील लिंकवर क्लिक करून बेल आयकाॅन दाबा.👇👇👇👇
-------------------------------------------------------

-------------------------------------------------------

Video News :


Clik: ■ *आज दुपारी चार वाजता आर्य समाज मंदिरात संस्कृत दिन समारोह*


Click &watch:■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*



Click &watch:*परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*

Video News :


Click: *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*


Click:*मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषणाची वेळ* • _पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार_


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!