MB NEWS-राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा आज अंबाजोगाई आणि परळीत दौरा

 *राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा आज अंबाजोगाई आणि परळीत दौरा*



अंबाजोगाई - महाराष्ट्राचे राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी हे शुक्रवारी (दि.१९) बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज्यपाल शुक्रवारी दुपारी अंबाजोगाईत येणार असून परळीत मुक्कामी थांबणार आहेत. 


शुक्रवार, दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.15 वाजता लातूर येथून अंबाजोगाई जि. बीडकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, ता. अंबाजोगाई येथे आगमन व जिल्हा सैनिक कल्याण मंडळ व रेडक्रॉस सोसायटी यांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीसाठी राखीव. दुपारी 1.30 ते 3.00 पर्यंत भोजनासाठी राखीव. दुपारी 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथून योगेश्वरी देवी मंदिराकडे प्रयाण. दुपारी 3.05 वाजता योगेश्वरी देवी मंदिर अंबाजोगाई येथे दर्शनासाठी राखीव. दुपारी 3.15 वाजता शासकीय वाहनाने परळीकडे प्रयाण. दुपारी 4.20 वाजता परळी वैजनाथ मंदिर, परळी येथे आगमन व दर्शनासाठी राखीव. दुपारी 4.40 वाजता परळी वैजनाथ मंदिर येथून शासकीय विश्रामगृह परळीकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह परळी येथे आगमन राखीव व मुक्काम. शनिवार, दिनांक 20 ऑगस्ट 2022 सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह, परळी जिल्हा बीड येथून लातूरकडे प्रयाण.

=================================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !