इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-शनैश्चर अर्बन निधी लिमिटेड चा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ

 *श्री.शनैश्चर अर्बन निधी लिमिटेड ग्राहकांचा विश्वास नक्कीच जिंकेल असा विश्वास प.पू.गुरुवर्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांनी व्यक्त केले.*



*ग्राहकांचा विश्वास हीच विकासाची गुरुकिल्ली...बाजीराव धर्माधिकारी*


 शनैश्चर अर्बन निधी लिमिटेड चा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ




परळी वैजनाथ दि.०१ (प्रतिनिधी)

          येथे श्री.शनैश्वर प्रतिष्ठान संचलित श्री. शनैश्चर अर्बन निधी लिमिटेडचा गुरुवारी (ता.०१) भव्य शुभारंभ श्रीगुरु वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर व बाजीराव धर्माधिकारी बोलत होते.

क्लिक करा व पहा: धनंजय मुंडेंचा शायराना अंदाज

           येथील श्री.शनैश्वर प्रतिष्ठान सामाजिक संस्था विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असते.या संस्थेने गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर श्री शनैश्चर अर्बन निधी लिमिटेडचा शुभारंभ श्रीगुरु वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या हस्ते व वैद्यनाथ बँकेचे माजी अध्यक्ष अशोक सेठ जैन यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून सदगुरु विश्वचैतन्य महाराज आष्टीकर, लोकमान्य पथसंस्थेचे अध्यक्ष पी.एस.घाडगे, सावरकर पथसंस्थेचे चेअरमन बाजीराव धर्माधिकारी, जागृती मल्टिस्टेटचे चेअरमन गंगाधर शेळके, शनी मंदिर देवस्थान सचिव शंकरअप्पा उदगीरकर, कोलुघाणा सेवा सहकारी सोसायटीचे सचिव विठ्ठलअप्पा चौधरी, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, कोलूघाणा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश लांडगे, मप्रांतिकचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, वैजनाथ कोल्हे, कुमार व्यवहारे, छगन आप्पा क्षीरसागर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.०१) सकाळी 11 वाजता संपन्न झाला. 

Click&watch:● पंकजा मुंडे-भाजप आणि महादेव जानकरांचं सूचक विधान.

यावेळी गुरुवर्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते फित कापून व संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गुरुवर्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांनी आर्शिवादरुपी मार्गदर्शन केले. तर बाजीराव धर्माधिकारी, प्रा.गंगाधर शेळके, पी.एस.घाडगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रविण फुटके तर आभार प्रा.मधुकर शिंदे यांनी मानले. यावेळी श्री. शनैश्चर अर्बन निधी लिमिटेडचे अध्यक्ष, संचालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


क्लिक करा व पहा:🔴 *प्रसिद्ध अभिनेत्री सूत्रसंचालिका स्पृहा जोशी म्हणतेय "आता तर मला परळीला यायलाच..."


Click&watch:➡️ *अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं परळी सोबतचं नातं.*


क्लिक करा व पहा:*वैद्यनाथ विद्यालयाचा पंकज नाईकवाडे एन.एम. एम.एस. शिष्यवृत्तीसाठी पात्र*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या