MB NEWS-फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देत मित्राच्या बायकोवर अत्याचार

 फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देत मित्राच्या बायकोवर अत्याचार



बीड ः फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देत मित्राकडून मित्राच्या बायकोवर बलात्कार केल्याचा प्रकार धारुर तालुक्यात उघडकीस आला. याबाबत धारुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धारुर तालुक्यातील एका गावात फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देत मित्राच्या बायको बरोबर दुष्कृत्य केल्याची घटना घडली. याबाबत पिडितेने धारूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर आरोपी मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीच्या तक्रारीनूसार धारूर तालुक्यातील असोला येथील विवाहित तरुणीला तू भेटायला ये म्हणत धमकी देत तिला रस्त्याने येत असताना पांढर्‍या गाडीमध्ये बळच बसवून बांगरवाडी रस्त्यावर नेऊन तिच्या गळ्यात हात टाकून अश्लील फोटो काढले. यानंतर तिला हे फोटो व्हायरल करतो म्हणून आरोपीने धमकी दिली व तिच्यावर अत्याचार केला. ही घटना दि.12 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 4 च्या वाजण्याच्या दरम्यान घडला. यानंतर तिला  धारूर येथे सोडून दिले. याप्रकरणी आरोपी सचिन सिताराम वाव्हळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक श्रीमती काळे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार