इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन कार्यावर आज परळीत चित्रप्रदर्शनी

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन कार्यावर आज परळीत चित्रप्रदर्शनी



पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उदघाटन ; प्रदर्शनाचा सर्व जनतेनी लाभ घेण्याचं भाजपचं आवाहन


परळी वैजनाथ ।दिनांक २८।

भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त "सेवा पंधरवाडा" उपक्रमातंर्गत त्यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रप्रदर्शन भाजपच्या वतीनं आज भरविण्यात येणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे.


  गुरुवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अक्षता मंगल कार्यालय येथे हे चित्र प्रदर्शन भरविण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांचा एकूण जीवन प्रवास, त्यांनी सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेली देशाची प्रगती याचा लेखाजोखा यात मांडला जाणार आहे. सर्व जनतेसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे.परळी शहर व ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बुथ प्रमुख, पेज प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, सर्व संस्थांचे लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या