MB NEWS-पंतप्रधान मोदी यांच्या जीवन कार्यावरील चित्रप्रदर्शनीचे पंकजाताई मुंडेंच्या हस्ते उदघाटन

 *पंतप्रधान मोदी यांच्या जीवन कार्यावरील चित्रप्रदर्शनीचे पंकजाताई मुंडेंच्या हस्ते उदघाटन*



*सर्व स्तरातील नागरिक, विद्यार्थ्यांची प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी !*


परळी वैजनाथ ।दिनांक २९।

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त "सेवा पंधरवाडा" उपक्रमातंर्गत त्यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रप्रदर्शनीचे उदघाटन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज झाले. 


  छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अक्षता मंगल कार्यालयात भाजपच्या वतीने हे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांचे बालपण, राजकीय प्रवास, पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेली देशाची प्रगती याचा लेखाजोखा या प्रदर्शनात चित्र स्वरूपात मांडण्यात आला होता. सुरवातीला फित कापून या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा व सर्व आघाडयांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


*पंकजाताई रमल्या विद्यार्थ्यांमध्ये*

-------------

चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांसह विविध शाळा, महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. पंकजाताईंचे आगमन होताच सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला, प्रत्येकाने टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं, त्या देखील त्यांच्यामध्ये रमल्या. 'भारतमाता की जय' चा जयघोष करत विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी राष्ट्रगीतही म्हटले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !