इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-शहरातील मोकाट जनावरांसह डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करा

 शहरातील मोकाट जनावरांसह डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करा


अन्यथा महिला काँग्रेस करणार न.प.समोर आंदोलन - आशाताई कोरे

परळी (प्रतिनिधी): परळी शहरातील मोकाट जनावरांसह, कुत्रे, डुकरांचा ताबडतोब बंदोबस्त करा अन्यथा परळी शहर महिला काँग्रेसच्या वतीने परळी नगर परिषदेसमोर तिव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा महिला काँग्रेस कमिटीच्या परळी शहराध्यक्ष आशाताई गणपतअप्पा कोरे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

सर्वत्र सध्या सणांची रेलचेल असुन परळी शहरात मोकाट जनावरांनी व डुकरांनी हैदोस माजवला आहे. जे रहदारीचे रस्ते आहेत त्या ठिकाणी मोकाट जनावरे बसतात तसेच डुकरे हे परळी शहरातील प्रत्येक भागात मोकाटपणे फिरस आहेत. याकडे नगर परिषद जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असुन मोठ्या प्रमाणात रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.नागरीकांचे आरोग्य धोक्यात घालण्याचे काम नगर पालिका करत असेल तर महिला काँग्रेस याचा जाब विचारणार असुन या लवकरात लवकर नगर परिषदेने या मोकाट जनावरांच्या बंदोबस्त नाही केला तर परळी शहर महिला काँग्रेसच्या वतीने परळी नगर परिषदेसमोर तिव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा महिला काँग्रेस कमिटीच्या परळी शहराध्यक्ष आशाताई गणपतअप्पा कोरे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या